/ Vivek Kale Nature Photography
 

 
 
 


चित्रनिबंध - श्वेतभुवईवाला गड्द निळा माशीमार
Photo essay : Ultramarine Flycatcher
March 2010
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded.
The photographs presented below are mapped and are interactive. Please move the mouse pointer over the subject to understand more about the external anatomical features of the subject. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation.
 
दिवाळीच्या धुमधडाक्यानंतर, तापमानात घट होते. उत्तरेकडून येणारे थंड वारे आपल्याबरोबर, हिमालयातून पाखर घेउन येतात. या स्थलांतरित पक्ष्यांमधे पाणपक्षी, माळरान पक्षी आणी काही रानपक्षी असतात. येणारे काही रानपक्षी संह्याद्रीच्या कुशीत विसावतात. एखाद्या घाबरलेल्या लहान पोरानी आपल्या आईच्या कुशीत लपावे, तसे पुण्या मुंबईच्या चंगळवादी माणसांना घाबरुन पळालेले जंगल आता संह्याद्रीच्या कुशीत तुरळक कुठेतरी आढळते. अशा या उरलेल्या दुर्मिळ रानीवनी हिवाळ्यात येउन विसावणार एक पाखरु आहे श्वेतभुवईवाला गडद निळा माशीमार. कोणी म्हणेल हे कसले नाव ? चिमणीपेक्षा छोट्या या पाखराचे मराठीत लघुनाव न सापडल्याने मी या पक्ष्याचा उल्लेख त्याच्या बाह्यवर्णावरुन "श्वेतभुवईवाला गडद निळा माशीमार" असा केला आहे. यास इंग्रजी भाषेत अल्ट्रामरिन फ्लायकॅचर असे संबोधतात. आपल्याकडे, फक्त हिवाळ्यात तुरळक प्रमाणात दिसत असल्याने व याच्या छोट्या आकारामुळे यास मराठीत लघुनाव नसावे.
 
Ficedula supercilliaris, Ultramarine Flycatcher, श्वेतभुवईवाला गड्द निळा माशीमार
 
Ultramarine flycather breeds in forests of Himalayas, north east India, and winters in open wooded areas of south India. The size of the bird is about 12 cm. The bird is seen in maharashtra in winter (October - February) in wooded region, ocasionally in small numbers. The bird is known by its color, Ultramarine. Ultramarine is actually a dark blue pigment, consisting silicates of aluminium and sodium with some sulphides. Ultramarine flycatcher was earlier known as white browed blue flycatcher. As the bird is occasionally seen only in winter in maharashtra, specific name in Marathi is not available.
 
Ficedula supercilliaris, Ultramarine Flycatcher, श्वेतभुवईवाला गड्द निळा माशीमार
 
इवलासा दिसणारा हा सुरेख पक्षी हिमालयाच्या कुशीतील वनांमध्ये घरटी करतो व हिवाळ्यात दक्षिणेकडे विसावतो. याचा आकार चिमणीपेक्षा लहान, अंदाजे १०-१२ से.मी. असतो. या पक्ष्याच्या तीन पोटजाती आहेत. पश्चिम हिमालयात आढळणारी सुपरसिलिआरिस, पुर्व हिमालयात आढळणारी ऍस्टिग्मा व आसाममध्ये आढळणारी क्लेटा.
 
There are three subspecies of this species. (Supercilliaris, aestigma and cleta). Ficedula Supercilliaris is the western race from the western Himalayas has a distinctive white supercilium, as seen in the image. Ficedula aestigma is from the eastern Himalayas and lacks distinct white patches. Cleta completely lack any supercilium as is seen in Asaam.
 
Ficedula supercilliaris, Ultramarine Flycatcher, श्वेतभुवईवाला गड्द निळा माशीमार
 
पश्चिम हिमालयात आढळणारी सुपरसिलिआरिस जात हिवाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात आढळते. सुपरसिलिआरिस पोटजातीचा पक्षी डोक्याकडे व पाठीकडे गडद निळा असतो. याच्या डोळ्यांवर सफेद भुवई सारखा पट्टा असतो. पोटाकडे सफेद रंग असतो. पाय काळसर असतात. याच्या छातीवर दोन बाजुस निळा व मध्यभागी सफेद रंग असतो. मादी मात्र पिंगट निळ्या रंगाची असते.
 
The upper plumage of Ficedula Supercilliaris male is a dull blue, set off by a white eyebrow. The lower plumage is white except for a blue collaret, which is interrupted in the middle.
 
Ficedula supercilliaris, Ultramarine Flycatcher, श्वेतभुवईवाला गड्द निळा माशीमार
 
हिवाळ्यात हा पक्षी पाणवठ्यावर आला कि त्याची लगबग पहाण्यासारखी असते. पाण्यावर फुट दोन फुट उंचीवर तो हवेत एकाच ठिकाणी पंखाची भिरभिर करतो. अशी हवेतली भिरभिर आपणास खंड्या, सूर्यपक्षी, कापशी घार या इतर पक्ष्यांमधे आढळते. आपल्याकडे आढळणार्या इतर माशीमार पाखरांमधे हा भिरभिरण्याचा प्रकार पहाण्यात नाही. ऊथळ पाण्यात तो संथपणे उतरतो व अंघोळ करुन पसार होतो. हा पक्षी एकटा वा दुकटा आढळतो.
 

 

Ficedula supercilliaris, Ultramarine Flycatcher, श्वेतभुवईवाला गड्द निळा माशीमार
 
These birds nest in holes. In winter, the birds visit the waterholes in open wooded country to drink the water and to take bath. While these birds visit the waterstream, they linger around on the low bushes. These birds have unique way of hovering above the water puddle (2-3 feet) to acess the location before taking the deep. The birds are very agile and make fast moves at the water stream. The birds are seen singly and sometimes in pair.
 
Ficedula supercilliaris, Ultramarine Flycatcher, श्वेतभुवईवाला गड्द निळा माशीमार
 
फाल्गुनात पाणझड संपली व चैत्रपालवी फुटली कि हि पाखर गायब होतात. उघड्या पड्लेल्या रानातील उन त्यांना सोसवत नसावे. हि पाखर कुठे जातात हे गुढच आहे. बहुदा ते पश्चिम हिमालयाच्या कुशीतील वनांमधे परतत असावेत असा समज आहे. उत्तर पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जंगल नाशामुळे व वाढत्या तापमानामुळे हिवाळ्यात येणारे हे पाहुणे पक्षी भविष्यात आपल्याकडे येतील का ?
 
Ficedula supercilliaris, Ultramarine Flycatcher, श्वेतभुवईवाला गड्द निळा माशीमार
 
Collage above illustrates the bush habitat, bird taking bath.
Quiz : Which is the bird shown in the collage in lower two blocks. Is it female Ultramarine flycatcher or Is it Immature Ultramarine flycatcher ?
References : My notes, Pocket guide to the Birds of the Indian subcontinent by Grimemtt-Inskipp-Inskipp, wikipedia, Birds of Asia by Rasmussen-Anderton and the Field books of Indian birds by Stuart Baker.


Contact me at kale_v@rediffmail.com for any queries and suggestions and email subscription.